VIDEO : Raigad Taliye Landslide | रायगडमध्ये मदत हवी ती मदत पोहचवली जाणार - विजय वड्डेटीवार

VIDEO : Raigad Taliye Landslide | रायगडमध्ये मदत हवी ती मदत पोहचवली जाणार – विजय वड्डेटीवार

| Updated on: Jul 23, 2021 | 3:24 PM

महाड तालुक्यातील तळीये गावात भीषण दरड कोसळून 36 जणांचा  मृत्यू झाला आहे. तळीयेतील मृतांसह राज्यभरातील मृतांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. तळीयेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

महाड तालुक्यातील तळीये गावात भीषण दरड कोसळून 36 जणांचा  मृत्यू झाला आहे. तळीयेतील मृतांसह राज्यभरातील मृतांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. तळीयेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात पावसाचा जोर आहे. अनेक ठिकाणी लोक पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 44 वर पोहोचली आहे. तसेच रायगडमध्ये मदत हवी ती मदत पोहचवली जाणार असल्याचे देखील विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.