Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या सभेनंतर भाजपकडून ट्वीट, देवेंद्र फडणवीस यांचा ‘तो’ जुना व्हिडीओ शेअर
VIDEO | मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्यातील अंतरवाली सराटी या गावातील सभेनंतर भाजपकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडीओ ट्वीट, कोणता होता तो व्हिडीओ, देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं होतं? बघा देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा व्हिडीओ
मुंबई, १४ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्यातील सभेनंतर भाजपकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन देवेंद्र फडणवीस यांचा तो जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात भाषण करताना दिसून येत आहेत. इतकेच नाही तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणताना दिसताय. तर मराठा समाजाची देखील आरक्षणाची मागणी आहे, ही मागणी योग्य आहे. मागच्या काळात आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते हायकोर्टाने वैध ठरवलं होतं. मात्र, प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यावेळचं सरकार आरक्षण टिकवू शकलं नाही, असं फडणवीस त्या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.