VIDEO : Vengurla Rains Updates | वेंगुर्लामधील मंदिरात शिरलं पाणी
राज्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावलीयं. वेंगुर्लामधील मंदिरात शिरलं पाणी आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानूसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून सर्वदूर जोरदार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टी भागासह सह्याद्री पट्ट्यातही पावसाचा जोर असून नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत.कालपासून सतत पाऊस पडत होता. मात्र आज सकाळपासून या पावसाने चांगलाच जोर धरला आहे.
राज्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावलीयं. वेंगुर्लामधील मंदिरात शिरलं पाणी आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानूसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून सर्वदूर जोरदार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टी भागासह सह्याद्री पट्ट्यातही पावसाचा जोर असून नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत.कालपासून सतत पाऊस पडत होता. मात्र आज सकाळपासून या पावसाने चांगलाच जोर धरला आहे.आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी एक हजार मिलीमीटरपेक्षा जास्त जिल्ह्यात पाऊस झाला असल्याची माहिती मिळते आहे. या हंगामात सर्वात जास्त पाऊस दोडामार्ग,देवगड व सावंतवाडी तालुक्यात पडल्याचे कळते आहे. तसेच पुढील काही दिवस अजून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जातंय.
Latest Videos