‘इंग्रजांची औलाद आहात काय?’, खासदार हेमंत पाटील यांनी अधिकाऱ्याला सुनावले खडेबोल
VIDEO | 'जास्त मस्ती आलीय का? एका मिनिटांत मस्ती उतरवेल', खासदार हेमंत पाटील यांनी अधिकाऱ्याला झापलं
मुंबई : सध्या सोशल मिडीयावर शिंदे गटातील एका खासदाराचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका तहसीलदाराला शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी चांगलेच फटकारल्याचे या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ‘शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्या. त्यांच्या समस्यांकडे कानाडोळा करू नका. तुम्हाला हे कितीवेळा सांगायचं? आता हे इंग्लिशमध्ये सांगू की वेगळ्या पद्धतीने? कशाची चरबी आली रे तुला? एका मिनिटात तुझी मस्ती उतरवेल’, अशा शब्दात शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी या अधिकाऱ्याला चांगलेच खडेबोल सुनावल्याचे पाहायला मिळत आहे. या लोकांच्या तक्रारीची दखल तुम्ही कधी घेतली? इंग्लिशमध्ये सांगू की वेगळ्या पद्धतीने सांगू? 100 लोकांच्या तक्रारी आहेत तुमच्याबद्दल. नीट राहा आणि नीट लोकांचं काम करा. मस्ती येऊ देऊ नका अंगात. एका मिनिटात मस्ती उतरवेन मी. सगळे लोकं तक्रारी करतात तुमच्याविरोधात. कुठली चरबी आली हो? लंडनहून शिकून आलात? इंग्रजांची औलाद आहात का? असा शब्दात हेमंत पाटील यांनी हिंगोलीतील एका अधिकाऱ्याला सुनावले.