केमिकल लोचा? उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करून राज ठाकरेंना डिवचलं
गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यावरून केमिकल लोचा म्हणत उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ठाकरे गटाने ट्वीट केला आहे. त्याच व्हिडीओला मनसेने व्हिडीओने उत्तर दिलंय. राज ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय म्हणत राज कारणातील मुन्नाभाई म्हणून राज ठाकरेंना डिवचलंय
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्यात व्हिडीओ वॉर सुरू झालाय. गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यावरून केमिकल लोचा म्हणत उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ठाकरे गटाने ट्वीट केला आहे. त्याच व्हिडीओला मनसेने व्हिडीओने उत्तर दिलंय. राज ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय म्हणत राज कारणातील मुन्नाभाई म्हणून राज ठाकरेंना डिवचल्याचा व्हिडीओ ठाकरे गटाने शेअर केलाय. तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या व्हिडीओला आरशात बघा म्हणत बदललेल्या भूमिकांचे व्हिडीओ ट्वीट केले. या व्हिडीओ वॉरला उद्धव ठाकरेंनीच सुरूवात केली. दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून राज कारणातील मुन्नाभाई म्हणून राज ठाकरेंवर टीका केली. हा व्हिडीओ ट्वीट करून राज ठाकरेंनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून घेरलंय. बघा कोणता आहे तो व्हिडीओ? काय म्हटल त्यात? आणि मनसेने काय दिलं प्रत्युत्तर?