आमदार अपात्रतेसंदर्भात लवकरच होणार फैसला! कधी होणार सुनावणीला सुरूवात?

आमदार अपात्रतेसंदर्भात लवकरच होणार फैसला! कधी होणार सुनावणीला सुरूवात?

| Updated on: Aug 09, 2023 | 9:40 AM

VIDEO | आमदार अपात्रतेसंदर्भात मोठी बातमी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतः घेणाऱ्या सुनावणीला कधी होणार सुरूवात?

मुंबई, ९ ऑगस्ट २०२३ | शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वतः प्रत्यक्ष सुनावणी घेणार असून पुढील आठवड्यापासून दररोज प्रत्येक आमदाराची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी यापूर्वीच लेखी उत्तर सादर केलं आहे. त्यामुळे आता शिवसेना आमदारांवरील अपात्रतेची कारवाईला पुन्हा वेग येणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांची सुनावणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात शिंदे गटातील आमदारांची म्हणणं मांडण्याची मुदत संपणार आहे. यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी त्यांना दोन आठवड्याची मुदत दिली होती. मात्र त्याआधीच ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी आपलं लेखी उत्तर सादर केले आहे.

Published on: Aug 09, 2023 09:40 AM