नाहीतर भिडेंनी वाढवलेल्या मिशा आम्ही कापणार, वटसावित्री पूजेवरून केलेल्या वक्तव्यावरून कुणी घेरलं?

नाहीतर भिडेंनी वाढवलेल्या मिशा आम्ही कापणार, वटसावित्री पूजेवरून केलेल्या वक्तव्यावरून कुणी घेरलं?

| Updated on: Jul 01, 2024 | 4:53 PM

नुकतंच संभाजी भिडे गुरुजी यांनी महिलांबद्दल वटपौर्णिमेच्या संदर्भातील एक वादग्रस्त विधान केलं आहे. भिडेंच्या या वादग्रस्त विधानावरून सोलापुरातील महिला संघटक आक्रमक झाल्या आहेत. भिडे गुरुजी यांनी महिलांच्या वाटेला जाऊ नये, हे खूप अति होत असून आता त्यांची वक्तव्य ऐकवलं जातं नाही.

संभाजी भिडे गुरुजींनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू, असा इशारा सोलापुरातील वर्ल्ड ऑफ वूमन्स (WOW) या महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी दिला आहे. नुकतंच संभाजी भिडे गुरुजी यांनी महिलांबद्दल वटपौर्णिमेच्या संदर्भातील एक वादग्रस्त विधान केलं आहे. भिडेंच्या या वादग्रस्त विधानावरून सोलापुरातील महिला संघटक आक्रमक झाल्या आहेत. भिडे गुरुजी यांनी महिलांच्या वाटेला जाऊ नये, हे खूप अति होत असून आता त्यांची वक्तव्य ऐकवलं जातं नाही. आम्ही काय करावं आणि काय करू नये हे सांगणारे भिडे गुरुजी हे कोण आहेत? ते आमचं घर चालवत नाहीत, असेही विद्या लोलगे यांनी केले आहे. तर यापुढे संभाजी भिडेंनी असे वादग्रस्त वक्तव्य केले तर त्यांचे पेहराव असणाऱ्या धोतरावर आम्ही बोलू शकतो. इतकंट नाहीतर त्यांनी वाढवलेल्या मिशा ही आम्हाला कापाव्या लागतील, असा इशाराच विद्या लोलगे यांनी दिला आहे.

Published on: Jul 01, 2024 04:53 PM