विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा लोकल प्रवास!
पण विजयसाठी हा अनुभव नवीन होता. परंतु चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लोकल ट्रेनने प्रवास करणं ही एक चांगली कल्पना आहे, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली.
मुंबई: ‘लायगर’ (Liger) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून विजय देवरकोंडाची अनन्यासोबतची केमिस्ट्रीही त्यांना खूप आवडली. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांनी मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास केला. या प्रवासापूर्वी विजय देवरकोंडा (Vijay Deverkonda) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) हे प्लॅटफॉर्मवर बसून ट्रेनची वाट पाहत होते. अनन्या ही मूळची मुंबईची असली तरी यापूर्वी तिने लोकल ट्रेनने क्वचितच प्रवास केला असेल. पण विजयसाठी हा अनुभव नवीन होता. परंतु चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लोकल ट्रेनने प्रवास करणं ही एक चांगली कल्पना आहे, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली.
Published on: Jul 29, 2022 01:17 PM
Latest Videos