मुख्यमंत्री आता तुम्ही माझी काळजी घ्याल, विजय शिवतारे नेमकं काय म्हणाले?
महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शिवसेना नेते विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळाले. या दोन्ही नेत्यांचं मंचावर मनोमिलन होताना देखील बघायला मिळालं
पुण्यातील सासवडमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला. महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शिवसेना नेते विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळाले. या दोन्ही नेत्यांचं मंचावर मनोमिलन होताना देखील बघायला मिळालं. ‘लोकांनी आमची दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पाहुद्या’, असं विजय शिवतारे म्हणाले. पुढे बोलत असताना शिवतारे म्हणाले, मिर्झाराजे यांनी देखील 1665 ला तह केला होता. कधीही आपला निर्णय न बदलणारा शिवतारेवर लोकांचा विश्वास आहे. संघर्ष न करता एवढं मिळालं. त्यामुळे माझं भविष्याचं राजकारणाचा काय होईल माहीत नाही. मी मुख्यमंत्र्यांचा शब्द ऐकला आहे. आता मुख्यमंत्री तुम्ही माझी काळजी घ्याल. बारामतीच्या विजयाचे लीड पुरंदर असणार असल्याचे आश्वासनही विजय शिवतारे यांनी दिलं.