बारामतीच्या नेत्यांनी देशाला ब्लॅकमेल करण्याचं काम केलं, कोणी केली पवार कुटुंबावर टीका?

“बारामतीच्या नेत्यांनी देशाला ब्लॅकमेल करण्याचं काम केलं”, कोणी केली पवार कुटुंबावर टीका?

| Updated on: Jun 05, 2023 | 4:05 PM

शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबावर सडकून टीका केली आहे. "बारामती लोकसभा मतदारसंघातील नेत्यांनी देशाला ब्लॅकमेलिंग करायचं काम केलं आहे. आतापर्यंत या मतदारसंघात चुकीच्या लोकांना निवडून देण्यात आलं आहे.

पुणे : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबावर सडकून टीका केली आहे. “बारामती लोकसभा मतदारसंघातील नेत्यांनी देशाला ब्लॅकमेलिंग करायचं काम केलं आहे. आतापर्यंत या मतदारसंघात चुकीच्या लोकांना निवडून देण्यात आलं आहे. या मतदारसंघाच्या जीवावर देशभर लोकांना यांनी फसवलं. यांनी फक्त बारामतीचा विकास केला. या भागाचा विकास का केला नाही? तुम्ही फक्त बारामती तालुका दाखवता बारामती लोकसभा मतदारसंघ दाखवा. बारामती लोकसभा मतदारसंघात यांना फुकटची मत आता मिळणार नाहीत.बारामती लोकसभा मतदार संघात यांना हरवणं काळाची गरज आहे”, असं विजय शिवतारे म्हणाले. तसेच शिवतारे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “राऊत यांची थुंकण्याची कृती विक्षिप्त आहे”, असे शिवतारे म्हणाले.

Published on: Jun 05, 2023 04:05 PM