कसला विकास केलाय? 50 वर्षात जे यांना जमलं नाही ते 5 वर्षात करणार, विजय शिवतारेंचा रोख कुणावर?
भोरच्या जनतेसाठी मुख्यमंत्र्यांना सांगून विकास कामांवरची स्थगिती उठवली. लोकांची काम झाली पाहिजेत, असं विजय शिवतारे यांनी म्हणत शरद पवारांवर हल्लाबोल केला. जे यांना 50 वर्षात जमलं नाही, ते विजय शिवतारे 5 वर्षांत करुन दाखवेल, असा शब्दही शिवतारेंनी दिला.
बारामती, २० मार्च २०२४ : महाविकास आघाडीच सरकार असताना भोरमध्ये सगळी काम ठप्प झालेली. कारण निधीवाटप चुकीच होतं. संग्राम थोपटे काँग्रेसचे आहेत. भोरच्या जनतेसाठी मुख्यमंत्र्यांना सांगून विकास कामांवरची स्थगिती उठवली. लोकांची काम झाली पाहिजेत, असं विजय शिवतारे यांनी म्हणत शरद पवारांवर हल्लाबोल केला. पवारसाहेबांनी 41 वर्ष आम्हाला परत परत मतदान करायला लावलं. बारामतीमध्ये दुसरी आडनाव नाहीत का?. पाच मतदारसंघातून पवार नावाशिवाय दुसरा कोणी प्रतिनिधीत्व करु शकत नाही का?. बारामतीमध्ये हजारो आडनाव आहेत, ते का नको? आम्ही परत पवारांना का मतदान करायच? आम्हाला तुम्ही काय दिलं? असा सवाल शिवतारेंनी केला. तर यांनी सर्व प्रकल्प बारामती शहरात आणले. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात प्यायला पाणी नाही. कसला विकास केला तुम्ही?. जे यांना 50 वर्षात जमलं नाही, ते विजय शिवतारे 5 वर्षांत करुन दाखवेल, असा शब्दही शिवतारेंनी दिला.