लोकसभा लढवणार की नाही? विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याचा दोन ते तीन दिवसात निर्णय घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर विजय शिवतारे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली दीड तास ही बैठक चालली यामध्ये नेमकी काय झाली दोघांत चर्चा
मुंबई, १८ मार्च २०२४ : लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याचा दोन ते तीन दिवसात निर्णय घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर विजय शिवतारे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली दीड तास ही बैठक चालली यामध्ये युती धर्माचे पालन करायचा आहे असे मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले त्यावर मी दोन ते तीन दिवसांमध्ये त्यांना माझा अभिप्राय कळवणार आहे, असे शिवतारे म्हटले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल केला. अजित पवार हा अत्यंत अहंकारी नालायक माणूस आहे. त्यांनी माझी औकात काढली होती अजित पवार यांनी माझा आवाकाही काढला होता. तुझी लायकी किती? तू बोलतो किती? तुझा आवाका किती? असं अजितदादा बोलले होते. माझा नाही अवाका तर कशाला धडपड करतो?, असा सवाल करत शिवतारेंनी अजित पवार यांच्यावर सडकून टीकाही केली. इतका नालायकपणा आणि इतका हेकेखोरपणा त्यांनी केला. त्यात माझी किडनी गेली आणि हार्ट गेलं. तरीही मी त्यांना माफ केलं. पण पुरंदरची जनता त्यांना माफ करणार नाही. बारामतीची जनता त्यांना माफ करणार नाही, असे शिवतारे म्हणाले.