मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शाब्दिक फायरिंग, सुनेत्रा पवार जिंकत नाही; शिवतारेंचा दावा
बारामतीमध्ये अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारे बोलवलं. यावेळी त्यांनी आपल्याला युतीधर्माचं पालन करण्यास सांगितलं. पण त्यावर आपण कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे शिवतारेंनी म्हटले.
मुंबई, १९ मार्च २०२४ : अजित पवार यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या विजय शिवतारेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शांत झाल्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री शिंदेंना भेटून आल्यानंतरही विजय शिवतारेंनी अजित पवार यांच्यावर शाब्दिक फायरिंग केली. बारामतीमध्ये अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारे बोलवलं. यावेळी त्यांनी आपल्याला युतीधर्माचं पालन करण्यास सांगितलं. पण त्यावर आपण कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे शिवतारेंनी म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दांच्या पलिकडे नाही, असे शिवतारे यांनी म्हटलंय त्यावरून बारामतीतून शिवतारे माघार घेण्याची दाट शक्यता असल्याचे दिसतेय. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतरही अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करणं शिवतारेंनी काही सोडलं नाही. दरम्यान, लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याचा दोन ते तीन दिवसात निर्णय घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर विजय शिवतारे यांनी दिली आहे.