2004 ला दादा मुख्यमंत्री असते पण शरद पवारांनी ‘तो’ प्रस्ताव नाकारला, कुणी केला गौप्यस्फोट?
'आपण अजित पवार यांना मुख्यमंत्री करा, असे पवारांना सांगितले. तर अजितदादा धाडसाने काम करणारे नेते आहेत. त्यांच्यामुळे पक्षही वाढणार आहे. परंतु शरद पवार यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यावेळी पवार साहेबांनी झटकून दिले. आपण दोन चार खाती जास्त घेऊ, पण मुख्यमंत्रीपद नको, असे पवारांनी म्हटले'
शरद पवार यांच्यापुढे अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु शरद पवार यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला, असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार यांचे विरोधक असलेले विजय शिवतारे यांनी केला आहे. पुढे शिवतारे असेही म्हणाले, दिल्लीत जाऊन आम्ही पाच लोकांनी त्यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील पाच नेत्यांमध्ये विजय शिवतारे, डॉक्टर महाजन, शिवाजीराव नलवाडे (मुंबई बँकेचे अध्यक्ष), रवींद्र पवार (मुंबई मनपा) मुबारक खान (अल्पसंख्याक प्रमुख) हे होते. २००४ मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. बैठकीत आम्ही सर्वांना राष्ट्रवादीचे आमदार जास्त आहेत, आपण अजित पवार यांना मुख्यमंत्री करा, असे पवारांना सांगितले. तर अजितदादा धाडसाने काम करणारे नेते आहेत. त्यांच्यामुळे पक्षही वाढणार आहे. परंतु शरद पवार यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यावेळी पवार साहेबांनी झटकून दिले. आपण दोन चार खाती जास्त घेऊ, पण मुख्यमंत्रीपद नको, असे त्यांनी म्हटले. त्यावेळी जर पवारांनी ऐकले असते तर आज जी परिस्थिती आहे ती आली नसती, असे मोठं वक्तव्यही विजय शिवतारे यांनी केलं.