अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आक्रमक होऊ लागले आहेत. इतकंच नाहीतर अजित पवार यांना हे नेते घेरताना दिसताय.
अजित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांसारखं बोलण्यापेक्षा बीडमध्ये येऊन सामान्यांशी चर्चा करावी, असं आवाहन शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केलंय. बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आक्रमक होऊ लागले आहेत. इतकंच नाहीतर अजित पवार यांना हे नेते घेरताना दिसताय. पुरंदरच्या विजय शिवतारे यांनी मस्साजोग येथे जात संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलंय आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षमतेचा दाखला देत अजित पवार यांना सवाल केलाय. तर मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना जोवर या प्रकरणात नाव समोर येत नाही तोवर कसा राजीनामा घ्यायचा, असं म्हणत अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा बचाव केला. मात्र दोन कोटी रूपयांच्या खंडणीची डील धनंजय मुंडे यांच्याच बंगल्यावर झाली असा आरोप करत हा आरोप खोटा ठरला तर राजकारण सोडेल, असं चॅलेंज भाजपच्या सुरेश धस यांनी दिलं. त्यानंतर विजय शिवतारे यांनी मस्साजोगच्या भेटीनंतर अजित पवारांवर निशाणा साधला.