“हा माझा पायगुण, आता फडणवीस विरोधात बसतील”, विरोधी पक्षनेतेपदी निवडीनंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
काल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सभागृहाकडून वडेट्टीवार यांचे अभिनंदन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते पदाच्या खुर्चीवर आसनस्थ केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले. यासर्व पार्श्वभूीवर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 04 ऑगस्ट 2023 | काल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सभागृहाकडून वडेट्टीवार यांचे अभिनंदन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते पदाच्या खुर्चीवर आसनस्थ केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले. यासर्व पार्श्वभूीवर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “माझा पायगुण असा आहे, की मी जेव्हा जेव्हा विरोधी पक्षात जातो विरोधी पक्षनेता बनतो, तेव्हा तेव्हा आमचं सरकार येतं. शंभर दिवस मी विरोधी पक्ष नेता राहिलेलो तेव्हा आमचं सरकार आलं. यावेळी सुद्धा मी विरोधी पक्षनेता झालो आहे, त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस या बाजूला येतील आणि आम्ही त्या बाजूला जाऊन म्हणजे आमचं महाविकास आघाडीचे सरकार लवकरच येईल.”
Published on: Aug 04, 2023 07:54 AM