Video | पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही निर्बंध लागू शकतात, मुख्यमंत्री सकारात्मक : विजय वडेट्टीवार
मुलांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील एकही मुलगा सुटणार नाही, अशी मोहीम आम्ही हाती घेतली आहे. त्यामुळे लसीकरण युद्धपातळीवर केले जाईल. शाळा बंद करण्याची वेळ येऊ शकते. तसा निर्णय ठाकरे घेऊ शकतात, असे वडेट्टीवार म्हणाले.
मुंबई : राज्यात आजपासून किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यावर मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवर यांनी प्रतिक्रिया दिलीय. मुलांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील एकही मुलगा सुटणार नाही, अशी मोहीम आम्ही हाती घेतली आहे. त्यामुळे लसीकरण युद्धपातळीवर केले जाईल. शाळा बंद करण्याची वेळ येऊ शकते. तसा निर्णय ठाकरे घेऊ शकतात, असे वडेट्टीवार म्हणाले.
Latest Videos