काँग्रेसमध्ये खदखद? विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले...

काँग्रेसमध्ये खदखद? विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले…

| Updated on: May 26, 2023 | 11:44 AM

VIDEO | नाना पटोले यांच्याविरोधात काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे धाव, प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणीवर विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत हाय कमांडकडे धाव घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष पदावरून काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले यांना बदलण्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे मागणी केली. तर विजय वडेट्टीवार, सुनील केदार, संजय निरूपम आणि शिवाजीराव मोघे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल व्हावा म्हणून विजय वडेट्टीवार, सुनील केदार, संजय निरूपम आणि शिवाजीराव मोघे यांनी दिल्लीत धाव घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलण्याची मागणी केली. यासंदर्भात माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. यासंदर्भात काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना सुद्धा भेटायला गेलो मात्र त्यांची भेट झाली नाही कारण ते दिल्लीत नव्हते. देशात काँग्रेसमय वातावरण होतं, निवडणुकीमागे ज्यांचं नेतृत्व होतं त्यांचं अभिनंदन करणं हा उद्देश होता’, असं त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये खदखद असल्याच्या चर्चांवर देखील भाष्य केले आहे.

Published on: May 26, 2023 11:44 AM