‘… नाहीतर हा देश सरकारला माफ करणार नाही’, विजय वडेट्टीवार यांनी कुणाचा घेतला कडवट शब्दांत समाचार
VIDEO | महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा विषय ताजा असतानाच आज स्वातंत्र्यदिनी सांगलीमध्ये संभाजी भिडे यांनी भगवा रॅली काढली, विजय वडेट्टीवार यांनी भिडे यांच्या भगवा रॅलीवर काय दिली प्रतिक्रिया
नागपूर, १५ ऑगस्ट २०२३ | आज देशाचा स्वातंत्र्यदिन सर्वत्र साजरा केला जात आहे. तर सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भगवा रॅली काढल्याचे समोर आले. यानंतर काँग्रेसमधूम तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून संभाजी भिडे यांच्यासह सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. आज स्वातंत्र्यदिनी सांगलीमध्ये संभाजी भिडेंनी भगवा रॅली काढली होती. त्यावर बोलतांना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मनोहर कुलकर्णी हा माणूस तिरंग्याला विरोध म्हणून भगवी रॅली काढतो आहे. ज्यांनी त्यांना गुरुजी म्हणून संबोधलं त्या विद्यार्थ्यांची भूमिका काय, हे महाराष्ट्र बघणार आहे. पुढे वडेट्टीवार असेही म्हणाले, देशाचे पंतप्रधान एकीकडे तिरंग्याला सलाम करतात आणि त्यांचे भक्त तिरंग्याला विरोध करतात, भगवा रॅली काढतात. यातूनच यांचा रंग कोणता हे दिसून येत आहे. या भिडेंनी राष्ट्रद्रोह केलेला आहे, भिडे खऱ्या अर्थाने राष्ट्रविघातक आहेत. “भिडेंवर त्वरित कारवाई झाली पाहिजे, नाहीतर हा देश सरकारला माफ करणार नाही. ज्यांनी गुरुजी म्हटलंय त्या विद्यार्थ्याची भूमिका काय असेल? हे देश बघतोय असे विजय वडेट्टीवार म्हणाले.