‘अपनों को ही खिलाऊंगा, सरकारचा नवा नारा’, कुणी केला हल्लाबोल?
VIDEO | भाजपचे मंत्री विजय कुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांना सरकारी योजनेत केंद्रानं दिलं १० कोटीं रूपयांचं अनुदान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात, बघा व्हिडीओ
मुंबई, १५ सप्टेंबर २०२३ | मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या केंद्रीय योजनेची लाभार्थी असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी म्हटलंय. तर भापचे मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांना केंद्र सरकारच्या कृषी विभाग योजनेसाठी १० कोटी रूपयांचे अनुदान मिळाल्याचा आरोपही विजय वडेट्टीवर यांनी केलाय. तर ‘ना खाऊंगा ना खाने दुंगाचा ढोल वाजवत मते घेणाऱ्या सरकारने जनतेसाठी काम करायचे असते, भाजपचे मंत्री आणि त्यांच्या मुलांसाठी नाही.. २०२३ मध्ये मोदी सरकारचा नारा बदलून तुम भी खाओ मैं भी खाऊंगा, असे झाले आहे’, असे ट्वीट विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अपनों को ही खिलाऊंगा, असा सरकारचा नवा नारा असल्याचे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी खोचक टोला लगावला आहे.
Published on: Sep 15, 2023 03:50 PM
Latest Videos