Vijay Wadettiwar LIVE | यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 436 लोकांचा बळी, विजय वडेट्टीवार यांची माहिती
10 पैकी 7 जिल्ह्यात 180 टक्क्यांपर्यंत पाऊस पडला, वीज पडून 196 जणांचा मृत्यू झाला. या पावसाळ्यात 436 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुलाब चक्रीवादळ आल्याने राज्यात अनेक भागात पाणी साचले. धरणे ओव्हरफ्लो झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मराठवाड्यात (Marathwada) तुफान पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. जवळपास 22 लाख हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
“पावसामुळे राज्यात प्रचंड शेती आणि मालमत्तेचं नुकसान झालं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जनावरं वाहून गेल्याच्या आणि मृत्यूच्या घटना घडल्या. यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत. मराठवाड्यासह एकूण 10 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये 180 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अजूनही 436 पैकी 6 मृतदेह मिळालेले नाहीत. तसेच 136 जण जखमी झाले आहेत”, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.