Vijay Wadettiwar on Metro | अनुशेष न भरल्यास FIR, विजय वडेट्टीवार यांचा नागपूर मेट्रोला इशारा

Vijay Wadettiwar on Metro | अनुशेष न भरल्यास FIR, विजय वडेट्टीवार यांचा नागपूर मेट्रोला इशारा

| Updated on: Sep 11, 2021 | 8:16 AM

नागपूर मेट्रोनं ‘बॅकलॅाग भरला नाही तर मुख्यमंत्र्यांशी बोलून एफआयआर दाखल करणार’ असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांचा नागपूर मेट्रोला इशारा देत या प्रश्नी मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेणार घेणार असल्याचं म्हटलं आहे.

राज्याची उपराजधानी नागपूर मेट्रोत आरक्षण डावलून पदभरती घोटाळा प्रकरणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत. नागपूर मेट्रोमध्ये भरती करताना आरक्षण डावलल्याने ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार संतप्त झाले असून ‘बॅकलॅाग भरा अन्यथा कारवाईस तयार राहा’, असा इशारा त्यांनी मेट्रो प्रशासनाला दिला आहे.

नागपूर मेट्रोनं ‘बॅकलॅाग भरला नाही तर मुख्यमंत्र्यांशी बोलून एफआयआर दाखल करणार’ असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांचा नागपूर मेट्रोला इशारा देत या प्रश्नी मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेणार घेणार असल्याचं म्हटलं आहे. ओबीसी, एससी, एनटींना डावलून ओपनच्या जास्त जागा भरल्या आहेत. ‘मंत्री असूनंही मेट्रो विरोधात मोठी भूमिका स्वीकारणार’ असल्याचा इशारा देखील विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. मेट्रो भरती घोटाळ्याची चौकशी करणार असल्याचंही ते म्हणाले.

Published on: Sep 11, 2021 08:16 AM