धैर्यशील मोहिते पाटील कुणाकडून लढणार? अद्याप अस्पष्ट पण प्रचाराला मात्र सुरूवात

धैर्यशील मोहिते पाटील कुणाकडून लढणार? अद्याप अस्पष्ट पण प्रचाराला मात्र सुरूवात

| Updated on: Mar 21, 2024 | 1:59 PM

करमाळा नंतर सांगोल्यात धैर्यशील मानेंनी भेटीगाठी घेतल्यात. दरम्यान सागंलीमध्ये महाविकास आघाडीतील तिढा काही सुटला नाही. चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर सांगलीतील लोकसभेची जागा चंद्रहार पाटील लढवणार याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिलेत

मुंबई, २१ मार्च २०२४ ; माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र ते कोणत्या पक्षाकडून लोकसभा लढणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. माढा लोकसभा मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रचार सुरू केला. तर उमेदवारीचा वाद मिटला असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र धैर्यशील पाटील आणि त्यांचे समर्थक भाजपच्या नाईक निंबाळकरांना मदत करण्यास तयार नाही. करमाळा नंतर सांगोल्यात धैर्यशील मानेंनी भेटीगाठी घेतल्यात. दरम्यान सागंलीमध्ये महाविकास आघाडीतील तिढा काही सुटला नाही. चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर सांगलीतील लोकसभेची जागा चंद्रहार पाटील लढवणार याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसही पारंपारिक जागा सोडायला काही तयार नाही. बघा सांगलीवरून मविआत ठिणगी, ठाकरे-काँग्रेसमध्ये नेमका वाद काय?

Published on: Mar 21, 2024 01:59 PM