VIDEO : Vinayak Mete | झोटींग समितीचा अहवाल गहाळ होईल असं वाटत नाही, खडसेंनी सत्याला सामोर जावं
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भाषणावर भाजमधून पडसाद उमटत असतानाच भाजपच्या मित्र पक्षांनीही त्यावर भाष्य करायला सुरुवात केली आहे. शिवसंग्रामचे नेते, आमदार विनायक मेटे यांनीही पंकजा यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भाषणावर भाजमधून पडसाद उमटत असतानाच भाजपच्या मित्र पक्षांनीही त्यावर भाष्य करायला सुरुवात केली आहे. शिवसंग्रामचे नेते, आमदार विनायक मेटे यांनीही पंकजा यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कौरव कोण आणि पांडव कोण याचं मूल्यमापन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करतील, असं सूचक विधान विनायक मेटे यांनी केलं आहे.
विनायक मेटे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे आणि भाजपमधील संघर्षावर भाष्य केलं. पंकजा मुंडे यांनी काय विचार करायचा, काय नाही करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. असे अनेक प्रसंग पंकजा मुंडे आणि भाजपमध्ये निर्माण झाले आहेत. त्यांनी कौरव किंवा पांडव असं भाष्य केलं. त्याचं योग्य मूल्यमापन भाजप, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील करतील, असं मेटे म्हणाले.