लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, नारायण राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
मंत्री असून देखील त्यांना इतकं लटकून लटकून उमेदवारी दिली अशी टीका करत नारायण राणे यांना तिसऱ्या वेळी पराभवाची हॅट्रीक करायला लागणार, असं म्हणत विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केलाय. विनायक राऊत पुढे असेही म्हणाले की, मोदींच्या कार्यकाळातील अकार्यक्षम मंत्री म्हणजे नारायण राणे.
नारायण राणे यांना लटकून लटकून उमेदवारी मिळाली असं म्हणत ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर जोरदार निशाणा साधलाय. मंत्री असून देखील त्यांना इतकं लटकून लटकून उमेदवारी दिली अशी टीका करत नारायण राणे यांना तिसऱ्या वेळी पराभवाची हॅट्रीक करायला लागणार, असं म्हणत विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केलाय. विनायक राऊत पुढे असेही म्हणाले की, मोदींच्या कार्यकाळातील अकार्यक्षम मंत्री म्हणजे नारायण राणे. सर्वांच्या उमेदवारी जाहीर झाल्या, केंद्रीय मंत्री असून सुद्धा त्यांना लटकवून लटकवून उमेदवारी दिली, यावरूनच त्यांची योग्यता आणि पात्रता कळून येते. मोदींना सुद्धा माहिती आहे या मतदारसंघातून नारायण राणे यांचा पराभव होणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मी विजयाची हॅट्रिक साधणार, असे म्हणत विनायक राणेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. राणेंना तिसऱ्या पराभवाची हॅट्रिक करावी लागेल. राणे असल्यामुळे हाय व्होल्टेज लढत नक्की होईल. राडेबाज संस्कृती आणि विकृती आम्ही येऊ देणार नाही. नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली देव पावला, असे म्हणत विनायक राऊतांनी निशाणा साधला.