शशिकांत वारिसे यांच्या मारेकऱ्यांची नार्को टेस्ट करा, ठाकरे गटातील नेत्याची मागणी

शशिकांत वारिसे यांच्या मारेकऱ्यांची नार्को टेस्ट करा, ठाकरे गटातील नेत्याची मागणी

| Updated on: Feb 14, 2023 | 7:58 PM

VIDEO | शशिकांत वारिसे यांच्या मारेकऱ्यांची नार्को टेस्ट करावी', विनायक राऊतांची मागणी

सिंधुदुर्ग : कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पात जमिनीच्या खरेदी विक्रीची चौकशी व्हावी. तसेच पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केलेल्या पंढरीनाथ आंबेरकर यांची नार्को टेस्ट किंवा लाय डिटेक्टर चाचणी करावी अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे केली आहे. पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. इतकेच नाही तर पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर यांची चौकशी करत असताना त्याच्यावरील पूर्वी कोणते कोणते गुन्हे दाखल झाले आहेत, याचीही सखोल चौकशी करा, अशी मागणीही विनायक राऊत यांनी केली आहे.

Published on: Feb 14, 2023 07:58 PM