ठाण्यासह मुंबईत रोशनी शिंदे प्रकरण तापलं, ठाकरे गट उद्या महामोर्चा काढणार
VIDEO | ठाण्यात राजकारण तापण्याची शक्यता, ठाकरे गट महामोर्चा काढणार, कधी आणि कुठं बघा?
मुंबई : ठाणे पोलिसांनी रोशनी शिंदे यांची तक्रार दाखल करून न घेतल्याने ठाकरे गट उद्या रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘रोशनी शिंदे यांच्यासारख्या महिलेला ४० जणांनी मारहाण केल्यानंतर त्याची तक्रार अजूनपर्यंत ठाण्याच्या पोलिसांनी दाखल करून घेतलेली नाही. आम्ही पोलिसांना भेटायला गेलो असताना एक तासापूर्वीच आयुक्त कार्यालय सोडून गेले होते. त्या संदर्भात महिलांवरती आरोप करणाऱ्या तसेच महिलांवरती हल्ला करणाऱ्या या लोकांच्या विरोधात गुन्हा नोंद न करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात आम्ही पोलीस आयुक्तालय यांच्याविरोधात मोर्चा काढणार आहोत. या मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संपूर्ण पदाधिकारी राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी यामध्ये उपस्थित असणार आहेत. या महामोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार असून आयुक्तालयाला टाळं ठोका अशा जोरदार घोषणाही यामध्ये देण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.