शिवसेनेतील नेते ठाकरे गटात परत आले तर? विनायक राऊत म्हणतात, “त्यांच्यासाठी मातोश्री…”
शिवसेनेचे बंडखोर आमदार, खासदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत येणार का? या चर्चा सध्या जोरात सुरु आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार, खासदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत येणार का? या चर्चा सध्या जोरात सुरु आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप आहे, मात्र पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय अंतिम आहे. गद्दारांसाठी मातोश्रीचे दरवाजे कधीच उघडणार नाहीत”, असे विनायक राऊत म्हणाले. तसेच तानाजी सावंत यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टीकेवर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील नेते हे माणुसकी नसलेले आहेत. या सर्व नेत्यांना विकृतीने पछाडलेले आहे.त्यांचं हे राज्य औटघटकेचं आहे. लवकरच त्यांचं विसर्जन लोकं करतील”, असं विनायक राऊत म्हणाले.
Published on: May 28, 2023 11:52 AM
Latest Videos