‘४ नाही तर इतक्या मंत्र्याची हकालपट्टी व्हावी’, ठाकरे गटातील नेत्याच्या दाव्यानं चर्चांना उधाण
VIDEO | शिवसेनेतील अनेक मंत्र्यांना डच्चू देण्याची आवश्यकता, ठाकरे गटाच्या नेत्यानं काय केलं भाष्य?
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार मंत्र्यांना हटवण्याचे केंद्रातून दबाव असल्याचा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तर दुसरीकडं मंत्र्यांच्या कामाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक बोलवली आहे. मात्र संजय राऊत यांच्या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. चार ऐवजी १० मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे. चार मंत्री बोलघेवडे मंत्री आहेत. त्यांची मंत्रीपदे गेली पाहिजेत. मंत्र्याच्या माध्यमातून कुठलीच कामे जनतेची होत नाही, असा आरोपही विनायक राऊत यांनी लावला. प्रताप जाधव यांनी नितीमत्ता शिकवण्याची भाषा करू नये. उद्धव ठाकरे यांनी एक कातळ शिल्प पाहिले. कातळ शिल्पावर अभ्यास होणं गरजेचं आहे. कातळशिल्पाचे संवर्धन जतन करणे यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचंही विनायक राऊत यांनी म्हंटलं.