VIDEO : नारायण राणेंना ठोकम ठोकी करायची सवय, एकनाथ शिंदेवरील वक्तव्यावरुन Vinayak Raut यांचा हल्लाबोल
नारायण राणेंच्या वक्तव्याचा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी समाचार घेतला आहे. राणेंना ठोकम ठोकी करण्याची सवयच आहे. स्वत:च्या अनुभवावरून इतरांना मोजण्याचा त्यांचा गुणधर्मच आहे, अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असा गौप्यस्फोट केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला होता. राणेंच्या या वक्तव्याचा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी समाचार घेतला आहे. राणेंना ठोकम ठोकी करण्याची सवयच आहे. स्वत:च्या अनुभवावरून इतरांना मोजण्याचा त्यांचा गुणधर्मच आहे, अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली आहे. राणेंना ठोकम ठोकी करायची सवयच आहे. शिंदे शिवसेनेसाठी अभिमान असणारे मंत्री आहेत, असं गौरवोद्गारही त्यांनी काढलं. जिल्हा नियोजनाची बैठक दहा दिवस आगोदर जाहीर केली आहे. नारायण राणेंना काटशह देण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. तसेच कोकणात येणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेला शिवसेना गांभिर्याने घेत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
Published on: Aug 22, 2021 12:46 PM
Latest Videos