Vinayak Raut: काय ते साँग, 8 वेळा आपटलं,ठाकरेंमुळे आमदार झालं- विनायक राऊत

| Updated on: Aug 22, 2022 | 10:16 AM

काय हे साँग, 8 वेळा आपटलं,ठाकरेंमुळे आमदार झालं असा टोलाही त्यांनी लगावला. धनुष्यबाणाचा टेकू मिळाला नसता तर शहाजी बापू नावाचा आमदार महाराष्ट्रात दिसला असता का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना केला.

विनायक राऊत आणि शहाजी बापू यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. शहाजी बापूंना विनायक राऊत यांनी सोंगाड्या म्हणून संबोधले. सोंगाड्या विकास कामं करणार का? असे म्हणत विनायक राऊत यांनी शहाजी बापू यांच्यावर टीका केली. काय हे साँग, 8 वेळा आपटलं,ठाकरेंमुळे आमदार झालं असा टोलाही त्यांनी लगावला. धनुष्यबाणाचा टेकू मिळाला नसता तर शहाजी बापू नावाचा आमदार महाराष्ट्रात दिसला असता का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना केला. यावर शहाजी बापू यांनीसुद्धा विनायक राऊत यांना प्रतिउत्तर दिले आहे. मला सोंगाड्या म्हणणाऱ्यांनी ते उद्धव ठाकरेंसमोर जोकरसारखे कसे नाचतात हे जनतेला एकदा करून दाखवावे असे शहाजी बाबू म्हणाले.