VIDEO : शिवसेनेवर टिका करण्यासाठी भाजपने नारायण राणेंचं बुजगावणं पुढे केलंय, Vinayak Raut यांचा घणाघात

VIDEO : शिवसेनेवर टिका करण्यासाठी भाजपने नारायण राणेंचं बुजगावणं पुढे केलंय, Vinayak Raut यांचा घणाघात

| Updated on: Aug 22, 2021 | 1:29 PM

एकनाथ शिंदे हाडाचे शिवसैनिक आहेत. शिंदे मंत्रीपदाला न्याय देत आहेत. पक्ष संघटना सुद्धा मजबुत करण्याचे काम करत आहेत, असं सांगतानाच स्वतःच्या अनुभवावरून इतरांना मोजणे हा नारायण राणेंचा गुणधर्म असल्याची खोचक विनायक राऊत यांनी केली.

विनायक राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना नारायण राणेंच्या विधानाचा समाचार घेतला. स्वार्थासाठी शिवसेनेशी बेईमानी केलेल्या राणेंना इतर सुद्धा तसेच दिसतात. याच भावनेमुळे एकनाथ शिंदेवर राणेंनी आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे हाडाचे शिवसैनिक आहेत. शिंदे मंत्रीपदाला न्याय देत आहेत. पक्ष संघटना सुद्धा मजबुत करण्याचे काम करत आहेत, असं सांगतानाच स्वतःच्या अनुभवावरून इतरांना मोजणे हा नारायण राणेंचा गुणधर्म असल्याची खोचक राऊत यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्यास सांगितलं. परंतु, पंतप्रधानाच्या या आवाहनाला राणेंनी हरताळ फासला. जन आशीर्वाद यात्रेतून राणेंनी लोकांचे किती प्रश्न समजवून घेतले?, असा सवालही त्यांनी केला.