लैंगिक शोषणाच्या आरोपावर बृजभूषण सिंह म्हणाले, कोणत्याही चौकशीसाठी तयार
देशातील महिला कुस्तीपटू यांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केलेत. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि संगिता फोगाट यांच्या नेतृत्वात रेसलिंग फेडरेशनविरोधात आंदोलन सुरू आहे
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर देशातील स्टार महिला कुस्तीपटू यांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केलेत. याआरोपावर प्रतिक्रिया देताना बृजभूषण सिंह यांनी माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहे, मी कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि संगिता फोगाट यांच्या नेतृत्वात महिला कुस्ती पटूंनी रेसलिंग फेडरेशनविरोधात हे आंदोलन पुकारले आहे.
तर “महिला पैलवानांनी केलेले आरोप खरे ठरले तर मी फाशी घेऊन स्वत:ला लटकवून देईन”, अशी प्रतिक्रियाही बृजभूषण सिंह यांनी दिली आहे. ते म्हणाले, मला जेव्हा माहिती झाले या आंदोलनाबद्दल मी त्वरीत दिल्लीला रवाना झालो, कोणीही माझ्यासमोर सांगू शकतं की मी लैंगिक शोषण केले आहे. हे आरोप चुकीचे आहे, असे म्हणत त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.