शिवाजी कर्डीले यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना नियमांचे उल्लंघन

शिवाजी कर्डीले यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना नियमांचे उल्लंघन

| Updated on: Dec 30, 2021 | 9:49 AM

भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले यांचा विवाह, मोठ्या थाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. मात्र या लग्नात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने दिसून आले. त्यामुळे हा विवाह सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

अहमदनगर : लग्नसराईला सुरुवात झाली आहे. या वर्षी राज्यातील दिग्गज नेत्यांची मुलं आणि मुली विवाहबंधनात अडकत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत, मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या मुलं-मुलींची लग्ने थाटामाटात पार पडली. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले यांचा देखील विवाह झाला. या विवाह सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप नेते राम शिंदे, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. मात्र या विवाहसोहळ्यात गर्दी झाल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.

Published on: Dec 30, 2021 09:48 AM