दादरच्या भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती
दादरच्या भाजी मंडईमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याने, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळत आहे. यातून कोरोनाच्या प्रसाराची भीती निर्माण झाली आहे.
मुंबई : राज्यामध्ये कोरोनाचा संसर्गं वाढत आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊ लागली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने राज्यात शिरकाव केला आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांकडून सर्रासपणे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. असाच प्रकार दादरच्या भाजी मंडईमधून समोर आला आहे. भाजी मंडई परिसरात ग्राहक मोठी गर्दी करत असून, कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.
Published on: Dec 26, 2021 10:15 AM
Latest Videos