व्हिआयपी दर्शनाचा फटका सामान्य भाविकांना; अधिक मासानिमित्त ट्रस्टचा निर्णय; ‘येथे’ राहणार VIP दर्शन बंद

| Updated on: Aug 13, 2023 | 8:41 AM

तर सलग सुट्ट्याही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आपसूकच लोकांची पावलं ही मंदिराकडे आणि देवदर्शनाकडे वळतात. त्यामुळे अनेक देवळांमध्ये भाविकांची वाढती गर्दी होताना दिसते. त्यामुळे अनेक मंदिरात व्हिआयपी दर्शन सुरू असते.

नाशिक, 13 ऑगस्ट 2023 | आपल्याकडे सध्या अधिक मास सुरू आहे. त्यामुळे सलग दोन महिने हा श्रावण पाळला जातो. तर सलग सुट्ट्याही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आपसूकच लोकांची पावलं ही मंदिराकडे आणि देवदर्शनाकडे वळतात. त्यामुळे अनेक देवळांमध्ये भाविकांची वाढती गर्दी होताना दिसते. त्यामुळे अनेक मंदिरात व्हिआयपी दर्शन सुरू असते. पण याचा सर्वाधिक फटका हा सामान्य भाविकांना बसतो. त्यामुळे आता 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये शिवभक्तांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येथे काल पासून 15 सप्टेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे. ज्यामुळे सामान्य शिवभक्तांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे. मात्र केंद्र आणि राज्य स्तरातील अधिकारी आणि इतर लोकांना राजशिष्टाचार म्हणून व्हिआयपी दर्शन दिले जाणार आहे.

Published on: Aug 13, 2023 08:41 AM
काका-पुतण्याच्या भेटीवर चर्चांना उधाण; काँग्रेस नेता म्हणतो, राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता?
Vande Bharat Express : कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी! आता धावणार मुंबई कोल्हापूर ‘ही’ एक्सप्रेस