Virar Breaking | विरारमध्ये दूध विक्रेत्याला बेदम मारहाण, नारंगी बायपास रोडवरील घटना
फॉर्च्युनर गाडीतून आलेल्या पाच ते सहा जणांनी दूध विक्रेत्याला पकडून, ठोसा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने गाडीत बसवून नेऊन त्याच्या जवळचे पैसेही काढून घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विरार पूर्व व पश्चिम परिसरात दूध विक्री करण्याच्या कारणावरुन ही मारहाण झाली असल्याचे समोर आले आहे.
दूध विक्रेत्याला पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना विरारमध्ये समोर आली आहे. दुकानातून बाहेर काढून 32 वर्षीय तरुणाला ठोसे-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. दूध विक्रीच्या कारणावरुन झालेल्या वादातून ही मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
शिवकुमार शेरबहाद्दूर सिंह असे मारहाण झालेल्या होलसेल दूध विक्रेत्या तरुणाचे नाव आहे. 22 जुलै रोजी विरार पूर्व नारंगी बायपास रोडवर सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. मारहाणीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
फॉर्च्युनर गाडीतून आलेल्या पाच ते सहा जणांनी दूध विक्रेत्याला पकडून, ठोसा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने गाडीत बसवून नेऊन त्याच्या जवळचे पैसेही काढून घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विरार पूर्व व पश्चिम परिसरात दूध विक्री करण्याच्या कारणावरुन ही मारहाण झाली असल्याचे समोर आले आहे.
याबाबत दोघा जणांवर विरार पोलीस ठाण्यात भादंवि कलम 362, 506, 147, 143, 149, 3/25, 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजन पाटील, दिनेश पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावं आहेत.