T20 World Cup जिंकल्यानंतर विराटच्या मुलीच्या मनात आला ‘हा’ पहिला प्रश्न; अनुष्का म्हणाली…
भारताला दणदणीत विजय मिळाल्यानंतर सर्वच भारतीय खेळाडूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. प्रत्येक खेळाडू एकमेकांना मिठ्या मारून आपला आनंद व्यक्त करत होते. टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत विश्वचषकावर नाव कोरलं. पण खेळाडू रडतात का असा साधा प्रश्न वामिकाला पडला. यावर अनुष्का सोशल मीडियावर म्हणाली...
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. तर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी जबरदस्त विजय मिळवला. या विजयानंतर विराट कोहलीने टी20 क्रिकेट फॉर्मेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. पण अनुष्का शर्माने एक ट्वीट करत आपल्या मुलीच्या मनात आलेला पहिला प्रश्न सोशल मीडियावरच शेअर काल. भारताला दणदणीत विजय मिळाल्यानंतर सर्वच भारतीय खेळाडूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. प्रत्येक खेळाडू एकमेकांना मिठ्या मारून आपला आनंद व्यक्त करत होते. टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत विश्वचषकावर नाव कोरलं. पण खेळाडू रडतात का असा साधा प्रश्न वामिकाला पडला. याची पोस्ट अनुष्काने केली आणि म्हणाली, “आमच्या मुलीने सर्व खेळाडूंना टीव्हीवर रडताना पाहिलं. त्यामुळे ती भावूक झाली आहे आणि त्यांना मिठी मारण्यासाठी कोणीतरी असेल ना असा प्रश्न पडला आहे. होय, माझी प्रिय मुलगी, त्यांना 1.5 अब्ज लोकांनी मिठी मारली आहे. किती अभूतपूर्व विजय आणि किती महान कामगिरी!! चॅम्पियन्स – अभिनंदन!!”, अशी पोस्ट अनुष्का शर्माने टीम इंडियाच्या विजयानंतर शेअर केली आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंटही केल्याचे पाहायला मिळत आहे.