ठाकरे गट आक्रमक, अधिकृत गद्दारीचा पुरावा का? बंडखोर विशाल पाटलांच्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चा
निवडणुकीच्या प्रचारात राबलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी पृथ्वीराज पाटील यांची स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला. पण लोकसभेत बंडखोरी केलेले विशाल पाटील काँग्रेसने स्नेहभोजनात कसे? काँग्रेसच्या अधिकृत गद्दारीचा हा पुरावा आहे का? असा सवाल करत ठाकरे गटाचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे या स्नेहभोजनाला बंड पुकारलेले विशाल पाटील हे देखील हजर होते. त्यावरून आयोजक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. सांगलीतून विशाल पाटलांच्या काँग्रेसच्या स्नेहभोजनाचे फोटो समोर आले आणि ठाकरे गटाचा भडका उडाला. लोकसभेत बंडखोरी केलेले विशाल पाटील काँग्रेसने स्नेहभोजनात कसे? काँग्रेसच्या अधिकृत गद्दारीचा हा पुरावा आहे का? असा सवाल करत ठाकरे गटाचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे. निवडणुकीच्या प्रचारात राबलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी पृथ्वीराज पाटील यांची स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला. यात विश्वजित कदम यांच्यासह जिल्ह्यातील नेत्यांनी हजेरी लावली तर बंडखोरी करून अपक्ष लढलेले विशाल पाटील हजर होते. बघा स्पेशल रिपोर्ट