जत तालुका महाराष्ट्राचा भाग, सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, विश्वजीत कदम यांची मागणी

“जत तालुका महाराष्ट्राचा भाग, सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे”, विश्वजीत कदम यांची मागणी

| Updated on: Jul 26, 2023 | 1:05 PM

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या दुष्काळग्रस्तांनी आता पुन्हा कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी थेट आंदोलन देखील सुरू केले आहे.काँग्रेस आमदार विश्वजीत कदम देखील या आंदोलनात सहभागी आहेत.

मुंबई, 26 जुलै 2023 | सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या दुष्काळग्रस्तांनी आता पुन्हा कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी थेट आंदोलन देखील सुरू केले आहे. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम देखील या आंदोलनात सहभागी आहेत. विश्वजीत कदम यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, “जत तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. त्यातसला काही भाग पाण्यापासून वंचित आहे. जत तालुक्यातील लोक कर्नाटक जरी बोलत असले तरी हा भाग महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. इथल्या लोकांचे प्रश्न सरकारने गांभीर्याने सोडवला पाहिजे, इथल्या लोकांना न्याय दिला पाहिजे.”

 

Published on: Jul 26, 2023 01:05 PM