विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या Structural Audit ला मान्यता, गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे प्राचीन स्वरूप जपण्यासाठी व सुशोभिकरण करण्यासाठी पुरातन विभागाकडून विठ्ठल व रुक्मिणी मंदिराचे इतिहासात पहिल्यांदाच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे.
पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिराच्या वास्तूला वैभवशाली परंपरा आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे प्राचीन स्वरूप जपण्यासाठी व सुशोभिकरण करण्यासाठी पुरातन विभागाकडून विठ्ठल व रुक्मिणी मंदिराचे इतिहासात पहिल्यांदाच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. नुकतंच याबाबत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. (Vitthal Rukmini temple structural audit by Archaeological Department)
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर हे अत्यंत प्राचीन आहे. या प्राचीन मंदिराचे जतन व्हावं पुढील अनेक पिढ्यांना या मंदिरा मधील प्राचीनता कलाकुसर पाहता यावी. यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणी ला मूळ रूप जतन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी एक डीपीआर बनवला जात आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या व्यक्तींकडून हा डीपीआर मंदिर समितीला प्राप्त होईल.