विठू माऊलीच्या भक्तांसाठी मोठी बातमी, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर दीड महिना बंद, काय कारण?

विठू माऊलीच्या भक्तांसाठी मोठी बातमी, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर दीड महिना बंद, काय कारण?

| Updated on: Mar 12, 2024 | 1:05 PM

विठू माऊलीच्या भक्तांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील विठुरायाचं भाविकांना काही दिवस दर्शन घेता येणार नाही. कारण येत्या १५ मार्चपासून पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे साधारण दीड महिना बंद राहणार आहे.

पंढरपूर, १२ मार्च २०२४ : विठू माऊलीच्या भक्तांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील विठुरायाचं भाविकांना काही दिवस दर्शन घेता येणार नाही. कारण येत्या १५ मार्चपासून पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे साधारण दीड महिना बंद राहणार आहे. मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामानिमित्त हे महिना दीड महिना बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दीड महिन्याच्या कालावधीत सकाळी ५ ते दुपारी ११ वाजेपर्यंतच देवाचं मुखदर्शन भाविकांना घेता येणार आहे. येत्या १५ मार्च पासून सुरू करण्यात येणाऱ्या मंदिराच्या कामकाजात विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशी काढण्यात येणार आहे. त्यामुळे गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश देण्यात येणार नसून सकाळी ५ ते दुपारी ११ वाजेपर्यंतच भक्तांना विठुमाऊलीचं मुखदर्शन केवळ घेता येणार आहे.

Published on: Mar 12, 2024 01:05 PM