बारामतीची लढाई आता ओरिजनल पवारांपर्यंत, पवार विरुद्ध पवार लढाईत गाजतोय ‘मूळ पवार’चा मुद्दा
लेकीला निवडून दिलं आता सूनेला निवडून द्या, असं आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं होतं. यावरून सुनेत्रा पवार या मूळ पवार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. इतकंच नाहीतर सुनेत्रा पवार मूळ पवार नसून त्या बाहेरच्या असल्याचे म्हटलंय. बघा काय म्हणाले नेमकं शरद पवार?
बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार अशी सुरू असणारी लढाई आता ओरिजनल पवार यांच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. लेकीला निवडून दिलं आता सूनेला निवडून द्या, असं आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं होतं. यावरून सुनेत्रा पवार या मूळ पवार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. इतकंच नाहीतर सुनेत्रा पवार मूळ पवार नसून त्या बाहेरच्या असल्याचे म्हटलंय. मूळ पवारांमध्ये फरक असंच विधान शरद पवारांनी केलंय. सुनेत्रा पवार या लोकसभेच्या बारामतीतील उमेदवार असून त्या अजित पवारांच्या पत्नी आहेत. सुनेत्रा पवार या मूळच्या धाराशीवच्या तेर गावच्या आहेत. मोठ्या राजकीय घराण्यातील आहे. आणि पद्मसिंह पाटलांच्या त्या बहिण आहेत. सुनेत्रा पवार यांचं वडिलांकडील नाव सुनेत्रा बाजीराव पाटील आणि आई द्रौपदी पाटील आहे. म्हणजेच लग्नानंतर सुनेत्रा पाटील या लग्नानंतर सुनेत्रा पवार झाल्यात. त्यामुळे अजित पवार यांनी सुनेत्रा निवडून द्या म्हणताच शरद पवार यांनी मूळ पवारचा मुद्दा उपस्थित केला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…