अवकाळीचा बाजार समितीच्या मतदानाला फटका, केंद्रांवर शुकशुकाट अन्...

अवकाळीचा बाजार समितीच्या मतदानाला फटका, केंद्रांवर शुकशुकाट अन्…

| Updated on: Apr 28, 2023 | 3:27 PM

VIDEO | अवकाळी पावसाचा पुण्यातील मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिणाम होणार? अवकाळीचा बाजार समितीच्या मतदानाला फटका आणि मतदारांचा खोळंबा

पुणे : राज्यात आज 147 बाजाप समित्यांची निवडणूक होत आहे. राज्यात एकूण 253 बाजार समित्यांपैकी 18 बाजार समित्या बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित 235 बाजार समित्यांसाठी आज आणि 30 तारखेला निवडणूक होणार आहे. इंदापुरात अवकाळी पाऊस कोसळल्यामुळे मतदान करण्यास निघालेल्या नागरिकांची दैना उडाली आहे. अवकाळी पावसामुळे बाजार समितीच्या मतदानाचाही खोळंबा झाला. अवकाळी पाऊस कोसळताच मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. पुण्यातील इंदापुरात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्याने मतदारांची तारांबळ उडाली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 14 जागांसाठी आज सकाळपासून मतदान पार पडतंय. मात्र दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान अचानक अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्यानं मतदान प्रक्रियेचा खोळंबा झाला. काही काळासाठी या ठिकाणी मतदार आणि कार्यकर्त्यांची मोठी तारांबळ झाल्याचा पाहायला मिळालं. अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्याने मतदान केंद्रावरती काही काळासाठी शुकशुकाट पाहायला मिळाला.

Published on: Apr 28, 2023 03:27 PM