लोकसभा निवडणुका जाहीर; बघा महाराष्ट्राचं डिटेल वेळापत्रक, कधी-कुठे होणार मतदान?
तुमच्या मतदारसंघात कोणत्या तारखेला मतदान होईल? यासह निवडणूक कार्यक्रमाबद्दलची माहिती जाणून घ्या..
मुंबई, १७ मार्च २०२४ : देशातील लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान पार पडणार आहे. १ ला टप्पा १९ एप्रिल, २ टप्पा २६ एप्रिल, ३ रा टप्पा ७ मे, ४ था टप्पा १३ मे आणि पाचवा टप्पा २० मे रोजी होणार आहे. या मतदानाची मतमोजणी ४ जूनला होणार आहे. तर विद्यमान केंद्र सरकारचा कार्यकाळ हा २६ जून २०२४ ला संपणार आहे. बघा कसं होणार मतदान?
- पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
- दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
- तिसरा टप्पा -७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
- चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
- पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.
Published on: Mar 17, 2024 11:34 AM
Latest Videos