वाघनखे महाराजांनी वापरलेली आहेत की शिवकालीन? काय आहे वाघनखांचा इतिहास?

वाघनखे महाराजांनी वापरलेली आहेत की शिवकालीन? काय आहे वाघनखांचा इतिहास?

| Updated on: Oct 01, 2023 | 9:58 AM

VIDEO | छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं 16 नोव्हेंबर रोजी भारतात परत आणण्यात येणार असून ती वाघनखं पुढील तीन वर्षासाठी भारतात असणार तर महाराष्ट्रातील चार प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये ही वाघनखं प्रदर्शनासाठी असणार... छत्रपती शिवरायांच्या वाघनखांचा इतिहास माहितीये का?

मुंबई, १ ऑक्टोबर, २०२३ | ब्रिटनच्या संग्रहालयातून महाराष्ट्रात शिवरायांची वाघनखं तीन वर्षांसाठी आणण्यात येणार आहे. तर महाराजांनी वारलेली वाघनखं ती नाहीत, असा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केलाय. आदित्य ठाकरे यांनी देखील सरकारने याबाबत खुलासा करावा अशी मागणी केलीये. शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगलेत. सरकार जे वाघनखं ब्रिटन संग्रहायलातून महाराष्ट्रात आणताय ती वाघनखे महाराजांनी वापरलेली आहेत की शिवकालीन? याची स्पष्टता सरकारने करावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. तर इंद्रजित सावंत यांनी सरकारच्या दाव्याला खोटं ठरवलंय. सरकारने समाजाची दिशाभुल करू नये, अनेक संग्रहालयात महारांजांनी वापरलेली वाघनखं असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे हीच ती वाघनखं आहेत. याचे पुरावे सरकारने द्यावे, असेही इंद्रजित सावंत म्हणाले. यावर काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार बघा…

Published on: Oct 01, 2023 09:58 AM