संध्याकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल- सुप्रिया सुळे

| Updated on: Jun 21, 2022 | 6:04 PM

विधान भवन परिसर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेच्या नाराजी नाट्याबद्दल त्यांना विचारण्यात आले. त्यावर संध्याळपर्यंत वाट पाहावी सर्व चित्र स्पस्ट होईल त्याशिवाय या सर्व प्रकरणामध्ये वेट अँड वॉच हेच योग्य राहील असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. नेमके काय चालले आहे त्याबद्दल मलाही माहिती नाही असं म्हणत त्यांनी उत्तरांना तिथेच […]

विधान भवन परिसर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेच्या नाराजी नाट्याबद्दल त्यांना विचारण्यात आले. त्यावर संध्याळपर्यंत वाट पाहावी सर्व चित्र स्पस्ट होईल त्याशिवाय या सर्व प्रकरणामध्ये वेट अँड वॉच हेच योग्य राहील असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. नेमके काय चालले आहे त्याबद्दल मलाही माहिती नाही असं म्हणत त्यांनी उत्तरांना तिथेच विराम दिला. दरम्यान शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची शिवसेनेबद्दलची नाराजी स्पष्ट झाली आहे. ते शिवसेनेच्या इतर नाराज आमदारांसोबत सुरत येथील ली मेरिडियन हॉटेल येथे थांबलेले आहेत. हॉटेल परिसरातील दृश्य आपण पाहू शकतो. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनाद करण्यात आलेला आहे. सेनेचे मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी काही वेळाआधीच सुरत येथे दाखल झालेले आहेत.

Published on: Jun 21, 2022 06:03 PM