Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडविरोधात ठोस पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा काय?
संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं. त्याच दिवशी वाल्मिक कराडचं आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये फोनवर संभाषण झालं. जवळपास 10 मिनिटे त्यांच्यात संभाषण झाल्याचा दावा एसआयटीने कोर्टात केला.
संतोष देशमुख हत्याप्रकऱणात वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्याबद्दल अटक झाली. यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर एसआयटीने वाल्मिक कराडचा ताबा घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. इतकंच नाहीतर वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी आणि बीड पोलिसांकडून सुरु असताना एसआयटीने मकोका कोर्टात वाल्मिक कराडचा ताबा मिळावा, यासाठी अर्ज केला असता तो अर्ज मकोका कोर्टाने मान्य केल्यानंतर वाल्मिक कराडची कोठडी मिळावी यासाठी एसआयटीने कोर्टात युक्तीवाद केले. यावेळी वाल्मिक कराडच्या वकिलांनी युक्तिवाद केला. वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर आहे, असे म्हणत कुठल्याही आरोपीने वाल्मिक कराडचे नाव घेतले नाही. वाल्मिक कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही. त्यामुळे वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असा मोठा दावा आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. तर यावेळी व्हिडिओ कॉन्फर्न्सिंगद्वारे सिद्धेश्वर ठोंबरे यांनी वाल्मिक कराड यांच्यासाठी युक्तिवाद केल्याचे पाहायला मिळाले.