'माझा मुलगा देवमाणूस, सुरेश धस माझ्या मुलाला...', वाल्मिक कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

‘माझा मुलगा देवमाणूस, सुरेश धस माझ्या मुलाला…’, वाल्मिक कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

| Updated on: Jan 14, 2025 | 12:52 PM

आज खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांनी परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. आपल्या मुलाला सोडावं. तो निर्दोष आहे असं पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज काही ना काही नव्या घडमोडी घडताना दिसताय. काल संतोष देशमुख यांच्या भावानं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. तर दुसरीकडे आज खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांनी परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. ‘आपल्या मुलाला सोडावं. तो निर्दोष आहे. खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडवर अन्याय झाला आहे.’, असं पारुबाई कराड यांनी म्हटलंय. परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत असताना पारुबाई कराड यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. माझ्या लेकाने काही केलं नाही. माझ्या लेकासाठी मी जीव द्यायला तयार आहे. इथून उठणार नाही, असा आक्रमक पवित्राच पारुबाई कराड यांनी घेतलाय इतकंच नाहीतर संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे, सुरेश धस यांच्यावरही गंभीर आरोप केलाय. संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे, सुरेश धस यांला अटक करा, माझ्या मुलाला विनाकारण अडकताय…गुन्हा नसताना अडकवताय, माझा मुलगा देवमाणूस असल्याचेही पारुबाई कराड यांनी म्हटलंय. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाल्याचेही पाहायला मिळाले.

Published on: Jan 14, 2025 12:52 PM