Anjali Damania Video : वाल्मिक कराडचा शोध ते सरेंडर, अजब-गजब किस्से अन् दमानियांनी केली पोलखोल
वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीच्या शोधापासून ते सरेंडरपर्यंतच्या घटनाक्रमावर दमानियांनी एक मोठा दावा केलेला आहे. या साऱ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून तीन माणसं काम करत होती असं सांगत त्यांनी याबद्दल सर्व खुलासा करणार असल्याचं म्हटलेलं आहे.
वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचा क्रूर चेहरा महाराष्ट्रासमोर उघड झाला. मात्र या साऱ्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या अडचणीत कमी झालेल्या नाहीत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कराडचं सरेंडर ते अटक होईपर्यंत धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून तीन माणसं काम करत होती असा धक्कादायक आरोप अंजली दमानियांनी केला आहे. दमानियांच्या दाव्यानूसार मुंडेंच्या सांगण्यावरून काम करणारा पहिला व्यक्ती शिवलिंग मोराळे. याच्याच गाडीतून वाल्मिक कराड पुणे सीआयडीत सरेंडर झाला होता. दुसरा व्यक्ती बालाजी तांदळे. कराडचा कट्टर समर्थक असणाऱ्या याच व्यक्तीला बीड पोलीस कराडच्या शोधासाठी सोबत फिरवत होते. आणि तिसरा व्यक्ती म्हणजे सरंग आंधळे. याचं काम पोलीस कारवायांची माहिती देणं होतं. यापैकी शिवलिंग मोराळे आणि बालाजी तांदळे या दोघांचे दावे हास्यास्पद आणि धक्कादायकही आहेत. वाल्मिक कराड सरेंडर होणार अशी बातमी पाहून शिवलिंग मोराळे स्वतःची चारचाकी गाडी घेऊन पुण्यात पोहोचला. तिथल्या एका चौकात कराडनं त्याला हात देऊन लिफ्ट मागितली. त्यानंतर मोराळे त्याच्या गाडीतून कराडला सीआयडी कार्यालयात सोडून आला असा हास्यास्पद दावा शिवलिंग मोराळेचा आहे. तर बालाजी तांदळे हा कराडला दैवत मानतो. सुदर्शन घुले ही त्याच्या ओळखीचा आहे आणि याच माणसाला आरोपी फरार असताना त्याच्या शोधासाठी बीड पोलीस सोबत घेऊन फिरत होते. बीड पोलिसांनी असं का केलं या प्रश्नावर त्यांचं उत्तर तुम्ही पोलिसांनाच विचारा असं तांदळे म्हणतो. बघा यावरचा स्पेशल रिपोर्ट

‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं

गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?

ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर

वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
